मराठ्यांची देशाबाहेरील युद्धस्मारके –
१८ व शतक मराठ्यांचं होतं , मराठ्यांनी दिल्ली जिंकली अटकेपार झेंडे रोवले. पुढच्या काळात मराठा साम्राज्य राहिलं नाही पण मराठे होते. मराठ्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय ” हि युद्धघोषणा देत हिंदुस्थानबाहेर आशिया,आफ्रिका,युरोप मध्ये जाऊन या खालील देशात जे पराक्रम केले ते निव्वळ तोंडात बोट घालायला लावणारे आहेत.मराठ्यांची देशाबाहेरील युद्धस्मारके –
- काहून (बलुचिस्तान )
- गोंडल (इथिओपिया)
- पेकिंग ,शांघाय (चीन)
- बसरा, कूट (इराक)
- करेन (इरिट्रिया, पश्चिम आफ्रिका )
- टॉब्रुक (लिबिया )
- टैबर (इटली )
- सिनाई (इजिप्त)
- दैरुज जूर (सीरिया)
- जपान
असे कित्येक देशात कित्येक पराक्रम जंगी पलटण,पूना पलटण, मराठा बटालियन, १०३ मरहट्टा अश्या विविध नावांने मराठ्यांने घडवले. या पराक्रमाची युद्धस्मारके पुणे ,दिल्लीत तर आहेतच पण त्या सोबत इराक च्या बगदाद आणि बसरा येथे , तुर्कीतल्या इस्तंबूल मध्ये , इजिप्त च्या सुएझ आणि कांतारा इथे , इटली च्या कासिनी इथे दिमाखात उभी आहेत.
पण या सगळ्याची सुरुवात झाली ती काहून च्या युद्धाने. अवघ्या १४० मराठ्यांनी तिथल्या क्रूर, खुंखार टोळ्यांना तब्बल ४ महिने रोखून धरलं . टोळ्यांशिवाय भूक,तहान, रणरणतं ऊन, अपुरी सामग्री ,दारुगोळा,अपुरे अन्यधान्य या सगळ्यांशी सुद्धा संघर्ष होता. आजवर कधी कुणी सविस्तरपणे हि युद्धगाथा लोकांसमोर आणली नव्हती. आमचे मित्र अभिषेक कुंभार यांच्या अलंकारिक लेखणीतून पहिल्यांदाच हि ‘काहून’ ची कहाणी कागदावर ससंदर्भ उमटली आहे. त्याचे स्वागत आपण सर्व मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमी उत्साहात कराल हा विश्वास आहे.(मराठ्यांची देशाबाहेरील युद्धस्मारके)
बुकिंग साठी संपर्क : सिद्धार्थ शेलार – 9921982828