जुन्नरला पाणीपुरवठा करणारे निजामकाळातील उसासे –
जुन्नर शहराची पाणीपुरवठा व्यवस्था निजामकाळातील होती. शिवनेरी किल्ल्याच्या जवळील पद्मावती तळे, अंधारी विहीर, बारा बावडी, कुंभार तलाव यातून विविध आकाराच्या खापराच्या पाईपलाईन द्वारे जुन्नर शहरात पाणी आणून ते शहरातील विविध पेठातून हौदात सोडविण्यात आले होते.जुन्नरला पाणीपुरवठा करणारे निजामकाळातील उसासे.
सन १४८५ ते १५९५ पर्यत जुन्नर शहरावर तसेच परिसरावर ,शिवनेरी किल्ल्यावर अहमदनगरच्या निजामाचा ताबा होता. निजामशाही काळातील स्थापत्य अभियंता ‘ मलिक अंबर ‘ यांने जुन्नर शहराला ( नगराला) पाणी पुरवठा करणारी खापराची पाईपलाईन ची योजना सन १४९५ मध्ये कार्यान्वित केली होती .
जुन्नर शहराचा भाग उंच – संखल आहे. जुन्नर शहरातील काही ऐतिहासिक पेठा साधारण पणे उंच भागावर आहे तर काही पेठा संखल भागावर वसलेल्या आहेत. शहरातील उंच भागातील पेठामध्ये खापराच्या पाईपलाईन द्वारे पाणी पोहचत नव्हते. उंच भागात पाणी जावे यासाठी शहरातील दहा – बारा ठिकाणी “उसासे ” काढण्यात आले होते.
बऱ्याच वर्षानंतर शहरातील पाईपलाईन नादुरुस्त झाली बऱ्याच पेठातील पाईपलाईन मध्ये माती बसून पाणी यायचे बंद झाले. अशा वेळी तातडीने उपाय म्हणून रावसाहेबांनी निजाम काळातील पाईपलाईन दुरुस्त करुन पाणीपुरवठा सुरळीत केला.
बापुजी ताम्हाणे, गोळेगांव – लेण्याद्री ( जुन्नर )
Mastch