संभाजी राजे जन्माला आले तेव्हा….
संभाजी राजे जन्माला आले तेव्हा आपण समजून घ्याव की हे एका थोर आणि सामर्थ्यशील पुरुषाचे म्हणजेच एका राज्याच्या अधिपतीचे पुत्र आहेत.
जिथे एका थोर पुरुषाची शिकवण मिळते ह्या भूमंडळी संकल्पना चालते तशीच पुढे चालू ठेवणारे छत्रपति संभाजी राजे आहेत. कर्तृत्ववान डोकं पुढे जातं ते ह्याच मार्गातून प्रेरणा घेत घेत जातं. ह्यावर वरील गोष्टीला अनुसरून एक पत्र आहे. संभाजी महाराजांनी ह्या पत्रात ऐसे लिहिले की आबासाहेबांचे संकल्पित आहे ते पुढे चालवावे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी गोपालभट अग्निहोत्री माभळेश्वरकर याजपासून मंत्रोपदेश घेऊन राज्याच्या अभ्युदयासाठी सूर्य अनुष्ठान सांगितले होते आणि त्या प्रित्यर्थ वर्षासन नेमून दानपत्रही दिले होते.संभाजी महाराज राज्यावर आल्यावर त्यांनीही राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य जाणोन ते आता गोपालाभट अग्निहोत्री ह्यांचे पुत्र रामभटास हे वर्षासन चालू ठेविले.
श्री
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ८ दुर्मतिनाम संवत्सरे कार्तिक शुद्ध शस्टी रविवासरे क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री राजा शंभु छत्रपति स्वामी यांनी राजश्री कासी रंगनाथ देशाधीकारी व लेखक प्रांत जावळी यासी आज्ञा केली ऐसीजे वेदमूर्ती रामभट बिन गोपालभट अग्निहोत्री माभलेश्वरकर यांनी हुजूर येऊन विदित केले की आपले पिते गोपालभट बिन श्रीधरभट याजपासून महाराज कैलासवासी ( शिवाजी महाराज) यांनी मंत्रउपदेश घेऊन आपल्या अभ्योदयाकारणे सुर्येपित्यर्थे अनुष्ठान सांगितले त्यास वर्षासन दांपत्र मोईन करून आमचे पिते यासी दिले. तेनेप्रमाणे चालत आले आहे. सांप्रत महाराजे चालविले पाहिजे, म्हणून विदित केले. तेणेप्रमाणे दानपत्र दाखविले व सुभाचे पत्र दाखविले. त्यास असल पत्रामधे लिहिले की, स्वामी भले थोर अनुष्ठाते सुर्ये उपासनी पद्महस्ती ऐसे जाणोन आम्ही स्वामिपासून मंत्रउपदेश संपादिला. त्यावरून आपल्या अभ्योदयार्थ सुर्येपित्यर्थे अनुष्ठान सांगितले त्यास वर्षासन प्रतिवरुसी द्यावयाची मोईन केली असे.
होन पातशाही शंभर गला नवसरे बारुले
वजन टां।।। मापे खंडी
।४ तूप। ४ तांदुळ
।४ तेल। ४ नागली
सुर्येपित्यर्थे अनुष्ठान प्रतिवरुसी यास सामोग्री व पूजा.
अनुष्ठान समई चंदन
नेसावयास व असन शुभ्र चंदन
१ पितांबर अरक्त चंदन
१ शाल
१ आसन
ये । होन । येकसे व गला नवसेर बारुले मापे खंडी आठ व वजन सवा अठरा मण व अरक्त वश्रे दोनी व पितांबर येक व शाल येक व असन येक येणे प्रमाणे दानपत्र करोन दिले, स्वामिनी आमचे अभ्योदयार्थ सुर्येपित्यर्थे अनुष्ठान प्रतिवरुसी करावे व मंत्रउपदेशही स्वामीचे वौषपरंपरेने आमचे वौषपरंपरेस करावा. आपण संकल्पपूर्वक वर्षासन दानपत्र प्रतिवरुसी करून दिले असे. आपले वौषपरंपरेने स्वामीचे वौषपरंपरेस उत्तरोत्तर चालवावे, यासि अन्नथा करून तर श्री महादेव साक्ष.
स्वामींनी निरंतर देवापाशी आमचे कल्याण इच्छावे. ऐसे दानपत्र महाराज आबासाहेब कैलासवासी स्वामिनी भट गोसावी यास करून दिले ते मनास आणून, व सुभ्याचे पत्र मनास आणून, त्यावरून राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य जाणोन, हाली वेदमूर्ती रामभट बिन गोपालभट यास वर्षासन सदरहू प्रा। सनद करून दिली असे. पूर्वी नख्त होन, १०० येकसे हुजूर पोतापैकी पावत होते व वरकड जीनस सुभा पावत होता. त्यास हुजूर ऐवज न पावे म्हणून नख्त व जिनस सदरप्रमाणे सुभे मजकुरावरी देवीले असे. तेनेप्रमाणे भटगोसावी यास साल दरसाल पावीत जाणे.ताज्या पत्राचा उजूर न करणे. अस्सल पत्र भोगवटियास परतोन भट गोसावी यापासी देणे.
( मर्यादे विजयते )
धाकलं धनी जन्माला आलं , श्री छत्रपति संभाजी राजे जयते.
माहिती साभार – मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)