कर्तृत्ववान स्त्रियांची यादी –
जिथे एका स्त्रीने गुलामगिरीच्या जोखडात खितपत पडलेल्या प्रदेशाला स्वत्वाची जाणीव करून स्वतःचे राजसिंहासन निर्माण केले, घडविले गेले आज त्याच महाराष्ट्राच्या कुशीत राजरोज स्त्रीभ्रूणहत्या घडते. शिवराय घडवायचे असतील तर जिजाऊ जन्माला आलीच पाहिजे. उद्याची जिजाऊ घडणे घडविणे आपल्या हातात आहे. याच महाराष्ट्राच्या इतिहासातील काही कर्तृत्ववान स्त्रियांची यादी आणि एका ओळीतील त्यांची ओळख
१. या मातेने एकच घडविला पण तो सुद्धा इतिहासचं घडला – जिजाऊ
२. राजा रणांगणात असल्यावर प्रशासन सुव्यवस्था सुस्थितीत असावी म्हणून राजकारणाच्या फडात उतरणाऱ्या – येसूबाईराणीसाहेब
३. नवऱ्याचे सुतकाचे दिवस उरकले अन मराठा स्वराज्याची धुरा हाती घेतली अन पेलली देखील – ताराराणी
४. समाजाला पुण्यत्व बहाल करत, राजकीय बाजू सांभाळून उभ्या देशात मंदिर बांधली – अहिल्याबाई होळकर
५. पतीच्या निधनानंतर मराठेशाहीचं सेनापतित्व करणाऱ्या – रणरागिणी उमाबाईसाहेब दाभाडे
६. शून्यातून निर्माण केलेले होळकरशाहीच पर्यायानं मराठ्यांचं वैभव गिळू पाहणाऱ्या इंग्रजांना पळता भुई थोडी केली – भीमाबाई होळकर
७. ज्या काळात घराच्या उंबरठ्याबाहेर विश्व नव्हते त्याकाळात न्याय निवाडे करणाऱ्या महिला म्हणजे – दिपाई बांदल
८. प्रतापगडपर्वामध्ये अनेक लढवय्ये परिचित आहेत, त्यातील एक अपरिचित नाव म्हणजे – बबई खोपडे
९. पुरुषांच्या जोडीने घोड्यावर मांड ठोकून उंबरखिंडीत उभ्या ठाकणाऱ्या वऱ्हाडी सरदारणी – सावित्रीबाई देशमुख / रायबाघन
१०. तंजावर जहागिरीच्या उत्तराधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या – राजकुमारी श्रीमंत मुक्तंबाबाई राणी साहेब छत्रपती
११. पोटच्या गोळ्याला पाठीशी बांधून वाघिणीप्रमाणे लढणाऱ्या – झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
१२. चिखल, शेणाचे गोळे अंगावर झेलत विद्येच्या माहेरघरात शिक्षणासाठी मोलाचा वाटा उचाणाऱ्या – सावित्रीबाई फुले
१३. ज्यांनी शेण गोवऱ्या रचून प्रपंच चालवला तेव्हा कुठे भारताचे संविधान घडले अश्या – रमाई आंबेडकर
१४. स्वतःच गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेऊन वसतीगृहातील विद्यार्थ्यांची ज्यांनी पोटं भरली अशा – लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
१५. अनाथांची माय म्हणून जे उभी हयात लहानग्यांचा सांभाळ करीत आहेत अशा – सिंधुताई सपकाळ
१६. स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये अग्रनीने नाव ज्यांचे घेतले जातं अश्या – रमाबाई रानडे
आम्हीच ते वेड