महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,432

यादवकालीन समाजजीवन

By Discover Maharashtra Views: 3704 10 Min Read

यादवकालीन समाजजीवन –

सुबाहु हा यादवांचा मुळ पुरुष तर सेऊणदेव हा संस्थापक देवगिरीच्या राजधानीपुर्वी सिन्नर चांदवड येथून राज्य कारभार केला. यादवकालीन मंदिरांमध्ये हिंगोली, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ शैव पंथीय तसेच शाक्त पंथीय आणि रट्टबल्लाळांचे कापालिक  इत्यादी पंथ होते हे शिलालेखात लक्षात येते. रामझोना, बसमत, येथील नृसिंह मंदिर मुळात शिवमंदिर होते. त्यातील शिलालेख आणि मंदिरावरील लेख ब्रम्हानंद देशपांडे यांनी शोधमुद्रा मध्ये लिहीलेला आहे.(यादवकालीन समाजजीवन)

इतरही मंदिरात ते शिव असो वा वैष्णव तिथे नरसिंह हमखास कोरलेला दिसतो. नामदेव महाराज यांच्या गुरूंचे नाव विसोबा खेचर होते.  अर्थातच नाथ संप्रदाय हा ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज यांच्या मैत्रीतील दुवा असावा. शैवमंदिरात शिव उपासनेत शीर अर्पण करण्याची प्रथा दिसते. कदाचित मनुष्यबळीची प्रथा असावी. रावणानुग्रह या शिल्पात रावण शिर अर्पण करतांना दिसतो. या काळात कोरलेल्या शिल्पात लिंगोद्भव शिवमुर्ती आणि रावणानुग्रह प्रामुख्याने दिसतात.  महाभारतातील वर्णनात बारा तोंडाच्या शिवाचे वर्णन केलेले आहे. तर धर्मोत्तरपुराणात अघोर, तत्पुरूष वामदेव असा तीनमुर्ती शिव दिसतो. या भव्य प्रतिमा औढा नागनाथला आहे तर धारासुर जे गंगाखेडच्या बाजूला आहे. विष्णूच्या प्रतिमांत अन्वा लक्ष्मीची अनेक रूपे आहेत. जवळजवळ चोवीस नृत्य आणि इतर भावमुद्रा आहे.  तर धारासुरच्या सुरसुंदरीत जया,वल्लभा, शुभ्रा दर्पणा या आहेत.  आंबेजोगाई योगेश्वरी शक्तीपीठ आहे येथे चार मंदिर आहेत. सकलेश्वर खोलेश्वर, आंबेश्वर  ही होत. कोकणातली कुमारी देवी माहेर कोकण अशी समजूत आहे. मंदिराच्या शिखरावर गणेशाची शक्ती वैनायकी  अठरा हातांची आहे तशीच वैनायकी भुलेश्वर पुणे सोलापूर रोडवरील मंदिरात आहे.

माणकेश्वर हे उस्मानाबाद जिल्ह्यात सिंघणदेवाचा लेख आहे सरस्वती नृत्य करताना शिल्प कोरलेली आहे. लातुर येथे जाजी येथे अजमुंडा ही दुर्गेची मुर्ती आहे. शिवलिंगातही द्विमुखी पंचमुखी असे क़रलेली दिसतात.परभणी जिल्ह्यातील मानवद येथे द्वादश तर लातुर महापुर येथील तीन मुख आहे १०८ शिवलिंग आहे. सातारा जिल्ह्यातील पाटेश्वर येथे १०८ शिवलिंग आहे.

मुकुंद दातार यांच्या ज्ञानेश्वरीतील समाज दर्शन मध्ये ज्ञानेश्वर, ” लोपले ज्ञान जनी, अवतारी पांडुरंग

नाव ठेवले ज्ञानी” ज्ञानेश्वर योगी, संत तत्वज्ञ व कवी होते. शिवाय  ज्ञानेश्वरी म्हणजे  यातील समाज कसा दिसतो? तर अदैतनिष्ठ भक्तीयोगाचे सामाजिक कर्मयोगाची सनद होय. मराठी ओव्या, नवव्या अध्यायात तसेच अठराव्या अध्यायात  दिसणारा स्नेहधर्म पसायदान दिसते.

नेवासे येथील १९५४-६६ मध्ये झालेल्या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आढळलेली आहे तर इसवीसन ११७५-१२१३ हा साधारणपणे यादवकाळ मानला जातो पण जवळपास बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात ही सत्ता होती हे वरील लेखात बघितले. अर्थातच हे नेवासे तेव्हा महाक्षेत्र असणार. तलावाचे चांदणे असे ऐहीक वर्णन तल अंतरस्वर असे तेराव्या आणि नवव्या अध्यायात दिसते. तेराव्या अध्यायात समाजदर्शन आहे. यातील एक विशेष वर्णन दखल घेण्याजोगे आहे ते म्हणजे विषयविध्वंस नाथपंथाचे मच्छिंद्रनाथ यांचे वर्णन केलेले आहे. अगदी गुरुंची परंपरा मागे मागे नेत गेले तर आपल्याला ही पाळेमुळे सापडतात. एकनाथ महाराजांचे परमगुरु श्री दत्तात्रेय हा उल्लेख एकनाथी भागवतात नवव्या अध्यायात येतो. नाथांचे परमगुरु शेख महंमद म्हणजे जनार्दन स्वामी किंवा चंद्रभट सुफी गुरू, चांद बोधला म्हणून ओळखले जातात. त्यांचे नृसिंह सरस्वती औंदुबर रहि  नरसोबावाडी येथील घाट एकनाथांनी बांधला ब्रम्हानंद देशपांडे यांच्या लेख, “योगवाणी” यात ही माहिती मिळते. एकंदरीत यादवकाळात वैचारिक क्रांतीची सुरुवात झालेली दिसते.

यादवकाळात काही मोठी सामाजिक परिवर्तन झाले का? परंपरा आणि रूढी बदलल्या का? तर याचे उत्तर नकारात्मक येते. या काळात जी मोठ्या प्रमाणात मंदिरे बांधली गेली, तसेच ताम्रपटही आढळतात, त्यावरून धार्मिक प्रभाव होता तसेच व्यापारातील आर्थिक संपन्नता होती याचेच प्रतिक आहे. सेक्युलर म्हणता येतील असे स्थापत्य दिसत नाही तर मठ होते आणि तिथेच अध्ययन सुरू होते असे लक्षात येते. पाटणे येथील संस्कृत पंडीतांची परंपरा तसेच मेथी आणि बलसाणे येथेही शैक्षणिक तसेच धार्मिक मठ असावेत असे शिलालेखातून कळते. परंतु विशेषतः पाटणे जवळील पितळखोरा, अजिंठा आणि पैठण येथील विद्यापीठात आधीच सुरू असलेल्या अध्यापनाची परंपरा यादवकाळातही सुरू असावी असे वाटते. फक्त जैन आणि पौराणिक देवदेवता विशेषतः शिवमंदिरे जिथे विष्णू आणि देवी असे तीन मंदिरे दिसतात. यावरून जसे की, सिन्नरचे गोंदेश्वर, चांगदेवचे, बलसाणे, मेथी, पाटणे अंजनेरी ही मठ आणि अध्ययनाची केंद्र चालुक्य काळापासून सुरू असलेली दिसतात. फक्त देवतांमध्ये बदल जसे की हरीभद्र म्हणजे शिव आणि विष्णू तसेच सप्तमातृका पण स्थानिक देवतांची नावे दिसतात,जसे कानबाई, इंदाई इत्यादी.(यादवकालीन समाजजीवन)

एका प्रकारे हे म्हणायला हरकत नाही की, स्थानिक देवता आणि लोकप्रिय देवतांचे एकत्रित पुजल्या जाऊ लागल्या. बहाळ सारखी व्यापारी केंद्र होते तसेच छोटेछोटे थांबे मुक्काम करायच्या जागांवरही असे देवळे दिसतात. औरंगाबाद बऱ्हाणपूर रस्त्यावर चांगदेव पंचातयन,  भोकर ॐकारेश्वर रावेरजवळील,  मुक्ताईनगर जवळ,  चारठाणे, हरताळे तसेच नागेश्वर ही देवस्थान तयार झाली. मेहुण शिलालेखात उल्लेख असलेल्या कलचुरी, चालुक्य यावरून आठव्या शतकाच्या आधीपासून ते औरंगाबाद बऱ्हाणपूर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक होते असे दिसते.

यादवकालीन समाजात चालुक्य, होयसाळ, राष्ट्रकुट तसेच परमार आणि आशीरगडावरील चाहमान अशी सतत एकमेकांच्या विरोधात आणि द्वेषात धुमसणारे राजे होते म्हणून मग प्रजेला नक्की कोणाची बाजू घ्यावी हा सतत गोंधळ आणि शेती सोडून मग सरकारी पगारावर लष्करी पेशा खुणावत असणार. सरदार आणि सामंतशाही मुजोर झाली होती.

प्रत्येक यादव राजाच्या पदरी असणारे मातब्बर मंडळी म्हणजे लहान प्रदेशाचे राजेच म्हणायला हरकत नाही. सतत बदलत राहणाऱ्या सीमांमुळे लोक वैतागले असावेत. देवळातुन दिसणारी संपन्नता ही दानलेखातून लक्षात येते की, मुख्य सेनापती, सरदार, सामंत यांनी दान दिले आहे. हा व्यापार आणि व्यवस्था चौदा पंधराव्या शतकापर्यंत सुरू होता.

ज्या वेळी जास्त कट्टर किंवा कर्मठपणा समाजात फोफावतो तेव्हा विरोध करणारे सुध्दा जन्माला येतात. चातुर्वर्ण्य चिंतामणी सारखा ग्रंथ लिहिला जातो त्याच वेळी संस्कृत गीता मराठीत आणण्याचे कामही ज्ञानेश्वर करतात तर चक्रधरांसारख्यांच्या पंथात स्त्रियांना समान स्थान मिळते. ज्ञानेश्वरी मराठीत आल्याने फार सामाजिक बदल झाले का? हा जरी महत्वाचा प्रश्न असला तरी कोंडी फुटून वाट तयार झाली, पुढच्या तीनशे वर्षांनंतरही तुकाराम महाराजांना कट्टर पंथीयांच्या क्षोभाला सामोरे जावे लागलेच.. म्हणजे बदल किती मुंगीच्या गतीने होत होते हे लक्षात येते.

यादवकालीन समाज लक्षात घेतांना कर्नाटक-तेलंगणा तसेच माळवा-गुजरात हा भागही लक्षात घ्यायला लागतो. त्यातील युद्ध घटना यांचा परिणाम झालेला दिसतोच.  हेमाद्री पंतांनी जेव्हा व्रतखंड हा ग्रंथ लिहिला तेव्हा परंपरा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यातून दिसून येतो. तसेच यादवकालीन धर्ममार्तंड असे स्थान मिळवून प्रस्थापित केले. वैदिक परंपरा तुटली का? असा प्रश्न पडत असला तरी जी मंदिर दिसतात, त्यांच्या समोर असलेल्या पुष्करणी किंवा विहिरी यज्ञासारखे विशेषतः पांचरात्र जी वैष्णव यज्ञाची पध्दत सुरू झालेली दिसते म्हणजे एका अर्थाने पौराणिक देवता आणि यज्ञ यांचा समन्वयक नवीन पध्दत उपासनेची दिसते. अर्थातच ही उच्च वर्णियांसाठीच असणार कारण जर ज्ञानेश्वरांच्या समकालीन नामदेवांना विठ्ठलाच्या देवळात प्रवेश नसेल तर कर्मठपणा होताच.

तत्कालीन लोकांनी यावर उपाय म्हणून नाथपंथ उदयास आलेला दिसतो.  अशी नाथपंथी देवळे यादवकाळात किती दिसतात? बरीच दिसतात. महाराष्ट्रात बरीच दिसतात पण ती डोंगरावर किंवा अनवट जागांवर आहे. अंजनेरी, नाशिक परिसरात, पश्चिम महाराष्ट्रात तसेच खानदेशातील सातपुड्याच्या डोंगरात आहेत. यात म्हणजे कर्मंठांत अस्तित्व टिकविण्यासाठी डिफेन्स टेक्निक वापरलेले दिसते. त्याची परिणती सामान्य माणसात जास्त रूढी परंपरा वाद रूजला आणि शेंडी राखणे, गंध लावून कान टोचणे, घरगुती पुजासमारंभ याची कृती जास्त वाढली.

खिलजी सारखे आक्रमणकर्त्यांनी मग नाथपंथी संस्थांना देणग्या दिल्या कारण त्यांना प्रस्थापित व्हायचे होते. या लाटेमुळे अजून धसका घेतल्यासारखे झाले.

ज्ञानेश्वरी मध्ये तांत्रिक उपासनेचे उल्लेख कसा धाक होता या दृष्टीने येतात तर गध्येगाळातील लेखात ही असुरक्षितता आणि धाक म्हणण्यापेक्षा दहशत दिसते. ब्रम्हहत्येचे पातक, गोहत्येचे पातक असे धाक दाखवलेले दिसतात. आर्थिक संपन्नता, सुखवस्तूपणा जास्त कर्मठ आणि धर्ममार्तंड बनवतो का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

संस्कृतीच्या उदय आणि अस्ताला समाजातील क्रिएटिव्ह मायनारिटी म्हणजे कारागिर जोपर्यंत आव्हान स्विकारतो तोपर्यंत समाज जिवंत असतो, ही परिस्थिती मधून रामदेवरायांच्या काळातील शिल्पकलेतून दिसते. पारंपारिकतेचा प्रभाव उत्सव, समारंभ यात म्हणजे कर्मकांडात गुरफटलेला आहे आणि त्याचा परिणाम हा  गुजरात येथील तसेच माळवा येथील वाघेला आणि परमारांना हरवून खिलजी दारात पोचला तरी एकाही राजा आणि सामंत किंवा पंडीताच्या हे लक्षात येत नाही.

ज्ञानेश्वरी हा मात्र विद्रोहाचा हुंकार आहे, विद्रोही प्रतिपादन आहे. या परिवर्तनाचा सुत्रधार कल्याणी चालुक्य बसवेश्वर जो कर्नाटकात लिंगायताचा पुरस्कर्ता आहे आणि विद्रोहाची सुरुवात सुध्दा आहे. महाराष्ट्रात महानुभाव पंथाने हे विद्रोही चित्र रेखाटले. हे परिवर्तन वादी पंथ आहे जातीव्यवस्था नाकारणारा विचार, प्रबोधनाचे पहिले चित्र दिसते.(यादवकालीन समाजजीवन)

आत्मपरीक्षण हे जिवंत समाजाचे लक्षण आहे. पाश्चिमात्यांनी आत्मपरिक्षणातून सुधारणा आणल्या. संपन्न कालखंडात समाज थिजलेला असतो का? या काळात यात्रा सुरू झाल्या, खंडोबाची यात्रा, मालेगावची यात्रा, ग्रामदैवत ही हळूहळू मोठी झाली जसे की जेजुरीची यात्रा आणि तत्सम इतर यात्रा होय.  पैठण, भोकरदन, खिद्रापूर ही व्यापारी गावे तर  सिंन्नर चांदवड  ही व्यापारी केंद्र झाली. अग्रहार म्हणजे दान दिलेल्या गाव जसे की कंदहार सारखी गावे होय. जमिनी कसून लागवडीत आली.

संदर्भ: डॉ. प्रभाकर देव, डॉ.किरण देशमुख यांचे व्याख्यान

@सरला

Leave a Comment