महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,880

यादवकालीन खानदेश भाग २

Views: 2542
7 Min Read

यादवकालीन खानदेश भाग २ –

स्वत:ला सेऊणदेशकर म्हणवणारे तसेच महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक भागात जवळपास ४५० वर्षे राज्य करणाऱ्या यादव घराण्याचा इतिहास हा महत्त्वाचा आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या  पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणार्‍या  यादव राजांची महत्त्वाचे योगदान आहे.  या वंशातील राजे दृढप्रहार, सेऊणचंद्र, धडियप्पा, राजुगि, वद्दगि, भिल्लम१, २, ३, ४, सेउणचंद्र, भिल्लम (पाचवा), जैतुगी(द्वितीय), सिंघणदेव (द्वितीय), कृष्णदेव, रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा आहे.(यादवकालीन खानदेश भाग २)

इसवीसनाच्या सातव्या शतकात हर्षवर्धनाचे साम्राज्याचा अस्त झाला आणि लागोपाठ भारतावर इस्लामी आक्रमणे सुरू झाले. परिणामी  भारतावर कोणाचीही एका राजाचे संपूर्ण साम्राज्य स्थापन करू शकले नाही. या धामधुमीच्या काळात अनेक नवनवीन राजघराणी उदयास आली. परमार, चाहमान, चालुक्य, कलचूरी, चंदेल, पाल इत्यादी अनेक मुलांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या राज्यांच्या सीमा वाढवण्याचा प्रयत्न केला.

मध्ययुगीन भारताचा इतिहास हा या राजघराण्याच्या आपसातील सततच्या युद्धांत भरलेला आहे. स्व पराक्रमाच्या जोरावर भाग्य काढू इच्छिणाऱ्या हा काळ सर्वस्वी अनुकूल होता. नव्याने उदयास येणाऱ्या या राजांना समाजात मान्यता मिळणे, हा मोठाच प्रश्न होता. सामान्यतः या घराण्यांचा प्रारंभिक इतिहास म्हणजे देशातील अस्थिरता आणि याचा फायदा घेऊन एखादा साहसी तरुण पुढे येणे आणि स्वतःच्या बळावर छोटे राज्यसंपादन करणे, हळूहळू त्याचे साम्राज्याचा विस्तार होणे आणि स्थिर झाल्यावर स्वतः मान्यता मिळवण्यासाठी आपल्या घराण्याचे मूळ थेट सूर्य-चंद्र यांच्यासारख्या देवतांची तसेच  यांचे मूळ पुरुष अर्बुद पर्वतावर केलेल्या अग्नीतून उत्पन्न झाले,  असे वशिष्ठ ऋषींच्या  यज्ञ अग्नीतून पुरुष निर्माण झाले, अशी एक कथा येते. देवगिरीच्या यादवांची कथाही त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. ते कधी स्वतःला सोमवंशी म्हणून घेतात. देवगिरीच्या यांनी दिलेल्या अनेक ताम्रपट आतून त्यांनी घेतलेल्या पदव्या आणि त्यांचा इतिहास समजून घ्यायला मदत होते. आणि त्यातील वंशावळ आणि पदव्या समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.

यादव भिल्लम द्वितीय याने संगमनेर ताम्रपटात यादव यांची वंशावळ ब्रम्हर्षीची, अत्री, इंदू पुरूवस आयुष्यमान वगैरे पुराणातील प्रसिद्ध नावे  अशी दिली तर  रामचंद्र देव यादवांचे पैठण ताम्रपटात नावांच्या यादीत चंद्र, पूरूरवस असा क्रम आढळतो. हेमाद्री आपल्या राज्यात स्थित यादव यांची वंशावळ देतांना दृढप्रहार या ऐतिहासिक यादव राजा  आधीची नावे इंदू बुध,पुरूरवस  प्रचेतस, आयुष्यमान वगैरे अशी एक मोठी भलीमोठी यादीच दिली आहे. आपल्या यादीत जाणून बुजून बराच विस्तार केलेला दिसतो. यात ऐतिहासिक त्याचा भाग कमी असला तरी हे मात्र लिहिण्याची आणि बारीक माहिती पुरवण्याची दक्षता घेतली आहे. आणखी एक म्हणजे म्हणजे “द्वारावतीपुराश्वर” ही पदवी घेतलेली दिसते. म्हणजे  द्वारकेचे स्वामी  समजत. नासिक्यकल्प यातील पौराणिक गोष्टीचा उल्लेख या  आधीच्या लेखात केलेला आहे.

यादवांच्या आधी महाराष्ट्रात राष्ट्रकुट या घराण्याचे राज्य होते. आणि दृढप्रहार हा यादव घराण्याचा संस्थापक हा या राष्ट्रकूट राजाकडे महासावंत होता. ते पद त्याने स्वतच्या बळावर मिळवलेले होते.

यादवांनी प्रारंभी मान्यखेडचे राष्ट्रकूट राजे आणि कल्याणी चालुक्यांचा मांडलिकतत्व स्वीकारल्यामुळे आपल्या सम्राट घराण्याची कानडी नावेही ठेवली असावी असा उल्लेख एन एम देशपांडे करतात तसेच त्यांचे काही ताम्रपट त्याचा पुरावा आहेत. (पण यानंतर येणाऱ्या भिल्लम या ओळीने पाचव्या भिल्लम या नावाबाबत कुणीच चर्चा करीत नाही. नाशिककल्प मधील जैन मुनींची कथा यावरून तसेच भिल्लम या नावावरून हे राजे भिल्ल असल्याची शक्यता जास्त आहे. तसेच तापी पुराणात एका भिल्ल  राजाला त्याच्या राणीने कशी संस्कृती शिकवली याची कथा येते)

हेमाद्रीच्या व्रत खंडातील राज्य प्रशस्तीत आणि यादवांच्या शिलालेखात आलेला सेऊण मंडळ आणि राजधानीचे नाव सेवनगर असे आढळते. अनेकदा लेखात सेऊणवंशी असेही लेखात उल्लेख सापडतात. राज्य प्रशस्तीतील श्लोकात श्रीनगर म्हणजे आधुनिक सिन्नर हे सेऊ देशात होते, असे म्हटले आहे. तसेच यादवांचे प्रारंभी शिलालेख आणि ताम्रपट संगमनेर, आश्वी, देवळाली, वाघळी, अंजनेरी आणि बहाळ येथे सापडले आहेत.

त्यावरून प्राचीन काळी औरंगाबाद जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे सेऊणदेश  म्हणजे खानदेश  होता हे लक्षात येते.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिलालेखात यादव राजांची वंशावळ आलेली आहे. तसेच मेथी येथील मंदिरावरही लिहीलेल्या लेखात ती दिसते. सिंधीनेर, सिन्नर म्हणजे प्राचीन श्रीनगर होते  आणि हे प्राचीन काळापासून महत्त्वाचे शहर असावे. यादवांचे पूर्वी सेऊन देशात सेंद्रकांच्या राज्यांची पुरावे सापडतात. सेंद्रक   नृपती वैरदेव व  निकुंभल्लाशक्ती  यांचे ताम्रपट, प्रशासने सापडली आहेत. यादवांचा मूळपुरुष दृढ प्रहार यास सामंत पदाचा मान होता हे दिसते.

यादवांची वंशावळ दृढप्रहार- सेऊणचंद्र प्रथम – धडियप्पा प्रथम- भिल्लम प्रथम- सिराज किंवा राजुगी -वडिंग किंवा वद्दिग – धडियप्पा द्वितीय- भिल्लम द्वितीय संगमनेर ताम्रपटावरून समजते. तसेच संगमनेर ताम्रपटात मधून  इ.स. ९७५-१००५   यादवांबद्दल बरीच माहिती मिळते. यातील महत्त्वाची माहिती म्हणजे वद्दिगाचा  विवाह राष्ट्रकुट राजा धोरप्पा यांची कन्या व्होडियव्वा हिचेशी  झाला होता आणि दुसरे असे की यादव राजवंशाचे इतिहासात प्रथमच त्याचे नाव सम्राट किंवा अधिपती असलेल्या राष्ट्रकूट घराण्याचा उल्लेख होय. सेऊनदेशचा वद्दिगचा  पुत्र भिल्लम  द्वितीय हा राष्ट्रकूट कृष्ण तृतीय (इसवी सन ९२९ ते ९३७) सामंत होता हे लक्षात येते. म्हणजे तोपर्यंत यादव हे सम्राट झाले नव्हते.

परमार राजा सियक  द्वितीय राष्ट्रकूटांची राजधानी मान्यखेट वर चालून आला आणि त्याने मान्य खेटचा संपूर्ण विध्वंसं केला. आता राष्ट्रकूटांचे मांडलिक हळूहळू स्वतंत्र होऊ लागले आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक चालुक्य यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. आणि राष्ट्रकूट कर्क द्वितीय ह्याचा मांडलिक तैलप द्वितिय स्वतंत्र झाला, तेव्हा कर्कराज  राजधानी सोडून गेला, असेही उल्लेख सापडतात. यावरून राष्ट्रकूट संपत येत होते आणि नवीन  राजे उदयास येत होते हे लक्षात येते.

तसेच संगमनेर ताम्रपटात भिल्लम  द्वितीय याने  राष्ट्रकुटांचा पडत्या काळात चालुक्यांच्या उगवत्या सत्तेला साथ दिली. चालुक्य तैलप द्वितीय याचे बाजूने परमारांच्या युध्दांत भाग घेतला वद्दिगापासून पुढच  राजे चालुक्यांचे मांडलिक समजले लागले.

संगमनेर ताम्रपटात मुंजाचा पराभव करून रणरंग भीम यास मदत केली. असे वर्णन येते. यावरून चालुक्य आणि परमार यांच्या अशाच जीवघेण्या युद्धात वद्दिगाचा पुत्र भिल्लम द्वितीय याने त्याच्या बाजूने पराक्रम गाजवून चालले असावी, हे लक्षात येते. वद्दिग हा राष्ट्रकूट कृष्ण  तृतीय  चा मांडलिक होता त्याने राष्ट्रकूट राजा धुडिप्‍पा किंवा ध्रुव द्वितीय निरुपम यांची कन्या हिच्याशी विवाह केला आणि यादव घराण्यातील राष्ट्रकूटांच्या हा शेवटचा मांडलीक राजा  होय. त्याचा पुत्र भिल्लम द्वितीय याने राष्ट्रकूटांच्या पडत्या काळात चालुक्यांच्या उगवत्या सत्तेला अर्ध दिले व चालुक्य यांच्या बाजूने परमार विरुद्ध युद्धात भाग घेतला व पासून पुढचे सर्व यादव घराणे आता चालुक्यांचे मांडलिक  झाले.

संदर्भ: देवगिरीचे यादव: डॉ.ब्रह्मानंद देशपांडे

बहाळ, वाघळी, पाटणादेवी, महेश्वर, मुधाई देवी, सिध्देश्वर या चाळीसगाव तालुक्यातील मंदिरातील शिलालेखात यादव घराण्याचा उल्लेख येतो. तर धुळे जिल्ह्यातील मेथी, बलसाणे या मंदिरात असलेल्या शिलालेखात तसेच चांगदेव मुक्ताबाई पर्यंत खानदेशात यादव राजांनी आपले मंदिर आणि इतर छाप सोडली आहे. महानुभाव पंथाचे साहित्य तसेच स्थानपोथी आणि या मंदिराच्या भिंतीवर कोरलेली दानलेख ही या काळातील राज्यव्यवस्था समजून घेण्यास मदत करतात.(यादवकालीन खानदेश भाग २)

– सरला & खानदेश फेसबुक पेज

Leave a Comment