यादवकालीन खानदेश भाग ५ –
धडियस व्दितीय हा दुसरा राजा इ.स. ९७२ याच वर्षी प्राकृत भाषेचा कवी धनपाल याने आपला ग्रंथ ” पाइयलच्छी” हा पुर्ण केला.(यादवकालीन खानदेश भाग ५)
वाक्पती मुंज – यांचा काळ इसवी सन ९७३ ते इसवी सन ९९५ हा होय. हे एक परमार घराण्याचा महान राजा होते. जे सियाक द्वितीय यांचे दत्तक पुत्र होते. आणि ज्यांनी राष्ट्रकूट घराण्याचा अस्ताच्या काळात नंतर माळवा राज्याची स्थापना केली. त्यांच्या प्राचीनतम अज्ञात पूर्वजांमध्ये मध्ये उपेंद्र कृष्णराज होते. यांना वापती द्वितीय असेही म्हणत. राज्याने घेतलेल्या पदव्यांत अमोघवर्ष, श्रीवल्लभ, पृथ्वीवल्लभ, परम भट्टारक , महाधिराज परमेश्वर या पदव्या येतात. त्यांच्या आणि तैलप्पाने यांच्या युद्धाचे उल्लेख अभिलेख तसेच ऐन ए अकबरी या ग्रंथात सापडतात. कुसुमावती (राजवल्लभ की ‘भोजचन्द्रिका’ के अनुसार)
वाग्पतीचा काळ परमार राज्यासाठी गौरव काळ होता. कौथेय या दानपत्रात त्यांच्या कारकिर्दीचा आढावा मिळतो. त्यांनी हुणं यांनाही पराजित केले. सफल विजेता असून साहित्य रसिक असा हा राजा होता. त्यांच्या राज्यभरात राजदरबारात विद्वानांमध्ये “यशोरूपक” चे रचियेता “धनिक”तर “नवसांहकचरीत” चे याचे लेखक पद्मगुप्त तर “दशरूपक” याचे लेखक धनंजय हे विद्वान होत. मुंज विषयी अजून एक साहित्य कृती आढळते, मुंज रास नावाची, मुंजरास हे एक अपभ्रंश रचना आहे. याच्या लेखकांच्या नावाचा पत्ता लागत नाही आणि त्यामुळे रचना काळात आणि विषय याविषयी माहिती मिळत नाही.
हेमचंद्र यांची व्याकरणाची रचना इ.स.११९० मधील आहे. त्यामुळे ही रचना याच काळात लिहिली गेली असावी. या ग्रंथात मुंज राजाची प्रणय जीवनाचे चित्रण आहे. कर्नाटकचा राजा चाल्युक्य तैलप्पा राजा यांनी बंदी बनवल्यावर यांचे प्रेम त्याची विधवा मुलगी मृणालवती बरोबर होते. राजा तिला घेऊन बंदी गृहातून पळून जाण्याचा प्रस्ताव ठेवतो. परंतु ती आपल्या प्रेमी बरोबर प्रणय संबंध तिथेच राहून ठेवू इच्छित होती. ज्यावेळेस तैलपाला हे कळले, तेव्हा परिणाम स्वरुप त्याने चिडून त्याला तिच्यासमोरच आपले प्रेम याला हत्तीच्या पायी देऊन हत्या केली, हे कथासूत्र असून ही रचना छोटी म्हणू शकत नाही.
वाक्पती मुंज यांच्यानंतर त्यांचाा छोटा छोटा भाऊ सिंधू हा परमाार हा गादीवर आला. राजा त्यांनी “कुमार नारायण” तसेच सहसांक या पदव्या घेतल्या. तसेच वाक्पती मुंज ह्यांनी आपल्याा नावाने. मुंज सागर नावाचा तलााव धार येथे बांधला.
मेरू तुंग हे एक जैन विद्वान होते, जे काठियावाड आणि गुजरातचे राहणारे होते. प्रबंधचिंतामणी हा जो जैन साहित्याचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, त्याची रचना मेरूतुंग या आचार्यानी केली. काही विद्वानांचे अनुमान असं लावलं जातं की प्रबंधचिंतामणी ही रचना इसवी सन १३०५ मध्ये झाली. हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे, जो पाच खंडात विभाजित केला आहे. या खंडाचे क्रमशः विक्रमांक, सातवाहन मूलराज, मुंज, भोज सिद्धराज जयसिंह, कुमारपाल, लक्ष्मण सेन, जयचंद्र इत्यादी विषयांवर माहिती मिळते. असे म्हटले जाते की आचार्य मेरूतुंग यांनी एक “भोज प्रबंध ” असाही एक ग्रंथ लिहिला होता जो आज उपलब्ध नाही. एवढे मात्र नक्की मेरू तुंग यांच्या “प्रबंधचिंतामणी” यात भोजन कथा सुद्धा येतात.
पद्मगुप्त हे राजा मुंजाचे आश्रीत कवी होते. ९७४-९९८ या काळात पद्मगुप्त हे राजाचे आज आश्रित कवी होते. ज्यांनी “नवसाहसासाहसांकचरित” हा ग्रंथ लिहिला, हे एक संस्कृत महाकाव्याची रचना केली. यात १८ सर्ग आहेत.आणि तो एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. यात काल्पनिक राजकुमारी शशिप्रभा हिच्या प्रणयकथेचा आविष्कार आहे तसेच माळवाचे राजा सिंधुराज यांच्या चरित्राचा काही भागही आहे असे विद्वानांचे मत आहे.
ते धारानगरी येथील सिंधू राज यांचे ज्येष्ठ भ्राता होते. यांच्यानुसार त्यांचा काळ इसवी सन १००५ असा आहे. त्यांचे वडिलांचे नाव मृगाङक गुप्त असे होते. त्यांना परीमल कालिदास असंही म्हटलं जातं. नंतरच्या कवी धनिक आणि मम्मट यांनी त्यांना उद्युक्त केलं आहे.
विद्वानांच्या दृष्टीत “नवसाहसाहसांकचरित” संस्कृत साहित्याच्या इतिहासात काव्यरचना तसेच प्रमाणे इतिहासाच्या चरित्र नायक अतिरंजित वर्णन आहे, ते यातही दिसते यातही वैदभी शैलीचा, कालिदासाची वापर केल्यामुळे कालीदासाचा प्रभाव दिसतो. हे महाकाव्य हिंदीत अनुवाद “चौखंबा विद्याभवन” या नावाने झालेले आहे.
मुंज तलाव मांडू धार’
भिल्लम द्वितिय यांच्या कर्तृत्वाचा विचार केला तर त्याच्या राज्यकाळातील संगमनेर ताम्रपट हा पहिला राजवंशातील लेख आहे यात यादवांची वंशावळ पौराणिक वंशावळ शंभु, ब्रम्हा, मरिची, अत्री, इंदु, पुरूरवा, आयुस, नहुष, ययाती, यदु अशी असून ऐतिहासिक दृढप्रहारी संस्थापकाला गाळले आहे.
संगमनेर ताम्रपटात भिल्लमाच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे व मुंज राजाला पराभूत केले आणि चंचल लक्ष्मीला आपला स्वामी रणरंगभीमाकडे पतीगृही परत आणले.
मेरूत्तुंगाचा प्रबंधचिंतामणी ह्यावरून कळते की चालुक्यांनी वारंवार आक्रमण करून अतिशय त्रास दिला. तैलप्पाने मुंजाला ठार मारले. तैलप्पाने मुंजास जिंकून बंदीत टाकल्यानंतर तैलप्पाची बहिण मृणालवती हिचे मुंजावर प्रेम बसले आणि दोघांनी मिळून पळून जाण्याचा गुप्त कट केला पण मृणालवतीने ही वार्ता तैलप्पाला सांगितली आणि रागावलेल्या तैलप्पाने मुंजास मृणालवती समोर हत्तीच्या पायी देऊन ठार केले.
भिल्लम द्वितीयच्या कर्तृत्वाचा विचार केला तर संगमनेर ताम्रपट उपयोगी ठरतो. संगमनेर ताम्रपटात राजाने एक नवीन शिवालयाची उभारणी केली, असे दिसते आणि मंदिरातील देवतेचे नाव विजयाभरण असे आहे. विजयाभरण हे भिल्लमाचेच एक बिरुद असावे. प्राचीन काळी मंदिराच्या निर्मात्याचे नाव त्या दैवतास सोडले जात असे. विजयाभरण हे भिल्लमास तैलप्पाने मुंज परमार आणि यांच्यातील युद्धात तील विजयानंतर दिले असावे. शिवाय या ताम्रपटातील बिरुदे महासामंत, आरातीसुदन, संग्रामराम, सेल्लविदेग कुंदुकाचार्य आणि द्वारावती पुरवराधीश्वर अशी येतात. काही कानडी बिरुद वाटतात.
लस्थियव्वा हे भिल्लम यांच्या पत्नीचे नाव असावे, लस्थियव्वा, लच्छीयव्वा किंवा लक्ष्मी म्हणूनही तिचे वर्णन संगमनेर, कळस, अश्वी आणि वसई ताम्रपटात येते. तिच्या वर्णनासाठी अश्वी ताम्रपटात येणारा श्लोक असा आहे.
भार्या यस्य च झंझाराजतनया श्रीलस्थियव्वाह्रया।
धर्मत्यागविवेकबुध्दीसगुणा श्रीराष्ट्रकूटान्वया।
या जाता नवबालराजसमये यध्वन्वयाधारिता।
सप्तांगोद्यतराज्यभारधरणात् राज्यत्रयार्ध्या तत: ।।
यावरून ती तीन राजकुळांना पवित्र आणि पुजार्थ होती. राजा झंझ हा शिलाहार राजा होता आणि शिलाहार आणि परमार यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते..झंझराजा हा राष्ट्रकुटांचा शाखेचा सामंत होता का? अशी बरेच प्रश्न आहे पण आपल्या मुलांना तिने चांगले शासक बनवले म्हणजे कदाचित ती लहान असतांनाच राज्य सांभाळण्याची जबाबदारी पडली असावी असे वाटते.
शिलाहार कालीन राज्याची कारकिर्दीत झंझराजा त्याने केलेल्या कार्याचा आढावा घ्यायला घेतांना झंझ राजा शिलाहार साम्राज्याच्या गादीवर इसवीसन 910 मध्ये आला. त्यांची राजकीय कारकीर्द वीस वर्षे अबाधित होती. पुढे त्याचा लहान भाऊ गोग्गीराज याने वारसा सांभाळला. राजाला एकच मुलगी होती जी चांदूरच्या यादव राजा भिल्लम चौथा यास दिली होती येथे कदाचित चौथा आणि दुसरा हा घोळ झालेला दिसतो. याने केलेली कामगिरी म्हणजे एकच होती. त्यांनी त्याच्या आयुष्यात एकच आणि उत्कृष्ट म्हणता येईल असं काम केलं ते म्हणजे तेरा शिवालये बांधली.
त्र्यंबकेश्वरची गोदावरी आणि खाली भीमाशंकर यातील प्रदेशात उगम पावणाऱ्या बारा नद्यांवर शिवमंदिर बांधले. येथे उपलब्ध असलेल्या ताम्रपट वरून ओळीतून आपल्याला राज्याची माहिती मिळते. त्र्यंबकेश्वर येथे अहिल्या तीर्थ जवळ नदीवर आहे.
- संदर्भ: देशपांडे श्रीकृष्ण परमानंद, देवगिरीचे यादव
- श. गो. तुळपुळे, यांचे मराठी कोरीव लेख.
- वि. भि. कोलते आणि शां. भा. देव यांचे, महाराष्ट्र आणि गोवे येथील शिलालेख व ताम्रपटांची सूची
यादवकालीन खानदेश भाग ५.
माहिती संकलन –