महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,480

महावीर येलजी गोठे (येल्या मांग)

By Discover Maharashtra Views: 4222 4 Min Read

महावीर येलाजी गोठे (येल्या मांग)

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे शिलेदार वीर पराक्रमी येलजी गोठे. पुणे येथील बारा मावळ भागात वीर येलजी गोठे यांचा जन्म झाला.

स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या दोन्ही पत्नींनी (अंबाई आणि बिबाई) यांनी  येल्ल्या गोठे असे नामकरण केले होते. यावरूनच पुढे येल्ल्या यांच्या वंशजांचे आडनाव गोठे असे प्रचलित झाले.

येलजी गोठे हे भरदार आणि पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या उंचपुरा असे योध्दा होते. अतिशय चपळ आणि युद्ध कलेतील तलवार बाजी आणि दांडपट्टा चालवण्यात अत्यंत माहीर असे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ते एक विश्वासू सहकारी होते. इ . स . १६४५ च्या महाशिवरात्रीच्या दिवशी रोहिडेश्वर (भोर) येथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यावेळी देखील ते (येल्ल्या गोठे) तेथे उपस्थित होते. त्यांच्या हाताने रोहिडेश्वर मंदिराला तोरण बांधण्यात आले होते. स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा गढ जिंकते वेळी वीर येलजी गोठे हे स्वराज्याच्या लढाईत सामील होते.याचा अर्थ असा कि स्वराज्याच्या स्थापनेच्या विचारांच्या सुरवातीपासूनच येलजी गोठे हे शिवाजी महाराज्यांच्या सोबत होते.

काही कालांतराने वीर बाजी पासलकरांची नेमणूक महाराजांनी स्वराज्याचे पहिले सरसेनापती पदी केली त्यावेळी आपल्या समाजाचा गौरव येलजी गोठे हे त्यांचे अत्यंत विश्वासू निष्ठावान आणि पराक्रमी असल्यनाने त्यांची नियुक्ती अत्यंत महत्वाच्या म्हणजेच वीर बाजी पासलकरांच्या अंगरक्षक पदी करण्यात अली होती.स्वराज्याचे काही शिपाई फितूर होऊन वीर बाजी पासलकरांना  दगा करण्याच्या विचारात होते.त्यामध्ये सोनुजी दळवी आणि मर्कतराव यांनी बाजी पासलकरांचा विरोधात एक कट केला होता. मर्कतराव हे वीर बाजी पासलकरांचे जावई होते .जावया पुढे सासरा हतबल होई असा विचार कदाचित शत्रूंनी केला असावा.

परंतु वीर बाजी पासलकर आणि वीर येलजी गोठे यांनी गनिमांचा डाव उधळून लावला . वीर पराक्रमी येलजी यांनी सोनू दळवी आणि त्यांच्या सोबतचे सैन्य तुकडी रोखून त्यांची धडे-मुंडके वेगळी केली. त्यावर वीर बाजी पसालकरांनी स्वराज्य पुढे आपल्या मुलीच्या कुंकवाचाही विचार न करता मर्कतरावना ठार केले.

निळोजीरावांच्या हातातून पुरंदर किल्ला स्वराज्यामध्ये आल्यानंतर आदिलशहाने पुरंदर किल्ला परत मिळण्यासाठी फत्तेखानास मुबलक सैन्यबळ देऊन धाडले होते. फत्तेखानाने सैन्याचा तळ  बेलसर येथे ठोकला होता. पुरंदर किल्ल्यावर त्यावेळी वीर बाजी पासलकर आपल्या सहकार्यांबरोबर होते. नेमके त्याच वेळी फत्तेखानाने चढाई केली. स्वराज्याच्या मावळ्यांनी फत्तेखानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. शेवटी उरल्या सुरल्या सैन्याबरोबर फत्तेखानाला पळावे लागले.त्यावेळी वीर बाजी पासलकरांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. वीर योद्धा येलजी हे बाजी पासलकरांचे  अंगरक्षक असल्याने तेही सोबत होते.

सासवड येथे फत्तेखानास गाठून बाजींनी त्याचा वध  केला. त्या समई काही शत्रू सैन्य फत्तेखानाच्या मदतीला बेलसरहून आले होते. नव्या दमाचे सैन्य युद्धात उतरले. त्यांनी वीर बाजी पासलकरांवर  हल्ला चढविला. आपल्या धन्यावर चढाई झालेली पाहून येलजी भलतेच खवळले. त्यांनी शत्रूंची दाणादाण उडविली. त्यावेळी काही वर्मी बाजी पासलकरांवर  बरसले. ते पाहून आपल्या शरीराची ढाल बनवून येलजी बाजींच्या समवेत झुंजले, आणि वीर बाजींच्या अंगावरील वार स्वतःच्या अंगावर झेलले, आणि आपल्या धन्यासाठी  या स्वराज्यासाठी वीर, पराक्रमी, स्वराज्याचा एकनिष्ठ शिलेदार येलजी गोठे धारातीर्थी पडले. त्यानंतर वीर बाजी पासलकर यांनाही या लढाई मध्ये वीर मरण आले.*

हि लढाई आपण जिंकली पण स्वराज्याचे महत्वाचे मोती गमावले. वीर बाजी पासलकर आणि वीर येलजी गोठे हे स्वराज्याच्या कमी आले.

तो दिवस होता ९ ऑगस्ट १६४८ चा सासवड येथे या दोन्ही महान वीर योद्धांच्या समाधी आहेत, वीर बाजी पासकलारांच्या समाधीच्या पश्चिमेस, एका दुकानाच्या पूर्वेच्या भिंतीच्या पायाशी वीर योद्धा पराक्रमी स्वराज्याशी एकनिष्ठ एकशिलेदार येलजी गोठे (येल्ल्या मांग ) यांची समाधी आहे.

माहिती साभार – अभय इंगळे

1 Comment